[ad_1]
Archana Patil : माझा नवरा भाजपचा (BJP) आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या धाराशीव लोकसभेच्या (Dharashiv Lok Sabha Constituency) उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील (Archana Patil) यांनी केलं आहे. अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीत आल्या होत्या. यावेळी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. त्यामुळं आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारला होता. यावर मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं त्या म्हणाल्या.
अर्चना पाटील यांच्या या वक्तांनंतर मोठी खळबळ
धाराशीव लोकसभा मतदारसंघातून अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. प्रचारानिमित्त त्या आज बार्शीत आल्या होत्या. यावेळी त्यांना बार्शीत तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार का? असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, अर्चना पाटील यांच्या या वक्तांनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अर्चना पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता
अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केलीय. महायुतीत धाराशीव लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. त्यामुळं अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे.
https://www.youtube.com/watch?v=xNgQlpS-0XM
महत्वाच्या बातम्या:
Dharashiv Loksabha: मोठी बातमी: धाराशीवमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, ओमराजे निंबाळकरांविरोधात अर्चना पाटील रिंगणात
अधिक पाहा..
[ad_2]